About
अर्जदार - चेतन खुशालराव बेले, युवा प्रबोधनकार, सप्त खंजिरी वादक
रा. चिकना पो.मौदा त.कामठी जी.नागपुर
माननीय महोदय,
आपणास सेवेशी अर्ज सादर करतो की मी चेतन खुशालराव बेले रा.चिकना पो. मौदा जी.नागपूर येथील रहिवासी आहे माझे शिक्षण MBA, BSC, DFA, ADFA, ADIS मध्ये पूर्ण झालेले आहे, मी समाज प्रबोधनाचे कार्यक्रम गेल्या बारा ते तेरा वर्षापासून करीत आहे आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुणे मुंबई वर्धा नागपूर यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर गोंदिया व त्याचप्रमाने याव्यतिरिक्त आंध्रप्रदेश,मध्यप्रदेश या राज्यात सुद्धा समाज प्रबोधन करण्याची संधी मला मिळाली तसेच आतापर्यंत माझे हजारच्या वर कार्यक्रम झालेले असून माझे लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनल आवाज इंडिया चैनल आकाशवाणी विदर्भ मीडिया कृषीप्रधान चैनल वर समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करण्याची संधी मला मिळाली मी प्रबोधनातून संविधान जनजागृती अभियान तसेच समाज परिवर्तन अंधश्रद्धा निर्मूलन व्यसनमुक्ती हुंडाबळी स्वच्छता अभियान जनजागृती सांस्कृतिक कार्य व विविध योजनेवर आणि अशा अनेक विषयावर व तसेच महापुरुषांचा इतिहास व त्यांनी समाजात केलेले कार्य त्यात संत तुकाराम महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले,शिवाजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचे विचार प्रबोधनाच्या माध्यमातून समाजासमोर मांडत असतो, समाजात प्रबोधनाचे काम करत असताना अनेक पुरस्कार सन्मानचिन्ह प्राप्त झालेले आहे, पाणीपुरवठा व स्वच्छ विभाग महाराष्ट्र शासन जिल्हा परिषद नागपूर यांच्यातर्फे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले, महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र शहर व ग्रामीण पत्रकार संघ नागपूर यांच्यातर्फे महाराष्ट्र जनप्रबोधनकार गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला, विदर्भ पत्रकार संघातर्फे लोकप्रबोधनकार पुरस्कार प्रदान करण्यात आला व या व्यतिरिक्त अनेक पुरस्कार प्राप्त झालेल्या आहे.
करिता कृपया महोदय मी केलेल्या कार्याची दखल घेऊन माझ्या अर्ज मंजूर करावा ही विनंती.
धन्यवाद !
आपला विश्वासू
चेतन खुशालराव बेले
युवा प्रबोधनकार नागपूर
8007458148