About
इंदुरीकर महाराज हे सुप्रसिद्ध कीर्तनकार आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी, गावी जाऊन इंदुरीकर महाराज किर्तन करतात त्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी हजारो लोक गर्दी करतात.आजकालची पिढी सामाजिक माध्यमांमध्ये इतकी गुंतत चालली आहे की ही सामाजिक माध्यमे तरुणांना आभासी जगाची स्वप्न दाखवतात आणि सत्य परिस्थिती पासून त्यांना दूर ठेवतात परंतु अशा वेळी कीर्तनकारांची उत्पत्ती होते जे समाजाला सत्य परिस्थितीची जाणीव करून देतात व समाजामध्ये प्रबोधन घडवून आणतात.